कानाचा शब्दार्थ काय?
仮名 कानाचा शब्दार्थ उसनी घेतलेली चिन्हे असा आहे. काना काङजी ह्या चित्रअंश जातीच्या लिपीतून विकसलेल्या आहेत. प्रत्येक काना हे एक चिन्ह असते. उदा., & हे एक चिन्ह आहे. तुम्हाला & ची वळणे (स्ट्रोक्स), & चा उच्चार, & चा अर्थ तिन्ही पाठ करावे लागतात. कानाला हे लागू पडते. त्यामुळे मराठी व्याकरणात कानाला काहीही म्हणता येत नाही.
मग काना कशी शिकावी?
पायरी ०१) शाळकरी पोरांच्या अंक गिरवायच्या, बेरीज-वजाबाकीसाठीच्या चौकटीच्या वह्या मिळतात. ह्या काना वळणं गिरवायला चांगल्या असतात. ह्यातली प्रत्येक चौकट जवळजवळ ०१ सें.मी. लांबी रूंदीची असते. सुरुवातीला २ आडव्या नि दोन उभ्या चौकटींचा एक मोठा चौकोन करावा. डावीकडच्या प्रतिमेने तुम्हाला ह्याची ढोबळ कल्पना येईल. त्याच्या सीमांवर स्केचपेन किंवा मार्करने रेष ओढावी. मोठ्या चौकोनातल्या रेषा तुम्हाला तुम्ही काढलेली चिन्हांची वळणे (स्ट्रोक्स) योग्य त्या चौकोनात नि योग्य त्या भागात येताहेत की नाही, हे पडताळणीसाठी गाइडलाइन्सचे काम करतील. एकदा का तुमच्या वळणांचा आकार हवा तसा नि वळणे चौकोनात हवी त्या ठिकाणी येऊ लागली, की पुढच्या पायरीला जा.
पायरी ०२) आता त्या ०१ सें. मी. लांबीरूंदीच्या एकाच चौकोनात चिन्हे काढा. आता चिन्हे छोट्या आकारात काढायची आहेत आणि पूर्वी मधल्या रेषांच्या रूपात असलेल्या गाइडलाइन्स इथे नाहीत. ह्यामुळे सुरुवातीला तुम्ही चुकाल, पण थोड्याच वेळात चिन्हे हवी तशी काढू लागाल. काढू लागलात, की पुढच्या पायरीला जा.
पायरी ०३) एकदा का तुमचा हात कानांच्या वळणांवर बसला, की निहोङगोतली छोटीछोटी वाक्ये कानात लिहावी; उदा., ग्रिटिङ्ग्ज्, सेल्फ् इङ्ट्रोडक्शङ् आदी. कारण, बर्याचदा कानांची वळणे लक्षात राहतात, पण काना नेमक्या वेळी आठवत नाहीत. ही अडचण वाक्ये लिहिल्यामुळे येत नाही. त्यासोबत बरीच वाक्ये डोक्यात बसतात. तुमची बोलीवरची पकड घट्ट होते. ही वाक्ये आता साध्या एकरेघी वहीत लिहावी. ह्यामुळे तुम्हाला वास्तवात लिप्या लिहिता येण्याचा सराव होतो. एकरेघीत वहीत तुमच्या शिकण्याचा कस लागतो. तुम्ही इथे सहजपणे लिहू लागलात, की तुम्ही काङजी शिकणं सुरू करा.
काङजी कशी शिकावी?
काना शिकायची पद्धत काङजीला लागू पडते. काङजी वळणे कानाहून किचकट असली, तरी सरावाने काङजीही हातात बसते. काङजी शिकताना तुम्ही सेल्फ इन्ट्रोडक्शङ, ग्रीटिङ्गात वापरायच्या शब्दांच्या काङजीने सुरूवात करा. म्हणजे त्या तुम्हाला वापरताही येतील नि लक्षातही राहतील.