मुख्य सामग्रीवर वगळा

इंग्रजीत स्पेलिंग का असते

इंग्रजी ही रोमन लिपीच्या २६ अक्षरात लिहीतात. पण, इंग्रजीत ४४ वर्ण आहेत. वर्ण म्हणजे एखाद्या भाषेतले आवाज होय. उदाहरणार्थ, मॅन शब्दात म्, अ‍ॅ, असे तीन वर्ण आहेत. ४४ वर्ण २६ अक्षरात लिहावे लागल्यामुळे एक वर्णासाठी अनेक अक्षरांची मांडणी रूढ झाली. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा वर्णक्रम म्हणजेच स्पेलिङ्ग लक्षात ठेवणे आले. उदाहरणार्थ, आङ्ग्लीत थ् नि द् वर्ण आहेत, पण त्यांसाठी अक्षरे नाहीत; म्हणून Thatcher(थॅचर) नि That(दॅट) या शब्दातील प्रथम ४ अक्षरे सारखी असूनही उच्चार वेगळे आहेत. गंमतीची गोष्ट ही की, इंग्रजीच्या सर्व वर्णांसाठी देवनागरी अक्षरे उपलब्ध आहेत. आपण ती वापरली, तर वर्णक्रम लक्षात ठेवावा लागत नाही. ह्यामुळेच नवनीतच्या इंग्रजीच्या मार्गदर्शकात वर्णक्रमाचे उच्चार देवनागरीत लिहीतात.