मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Featured Post

निहोङगो तोंडओळख प्रमाणपत्र अभ्यासक्रम

  Unit Name and Topics 01 Conversation Skills Self-introduction Daily used greetings Numbers up to 1,00,000 Days of week, months Date and Time 02 Scripts in Nihongo Introduction to scripts in Nihongo & the history related to scripts Hiragana script & rules of word-formation Katakana script & rules of word-formation Understanding the concept of Kanji, its readings (Nihongo and Hanzi readings) Introduction to Kanji Understanding the way of writing sentences using Hiragana, Katakana & Kanji ...
अलीकडील पोस्ट

निहोङ्गो शब्दपरडी ०२

०१) わたし(वाताशि)- मी ०२) あなた(आनाता)- तुम्ही ०३) はい(हाइ)- हो ०४) いいえ(इइए)- नाही ०५) せんせい(सेङसेइ)- शिक्षक ०६) がくせい(गाकुसेइ)- विद्यार्थी ०७) です(देसु)- आहे ०८) じゃありません(जि या आरिमासेङ)- नाही ०९) おかあさん(ओकाआसाङ)- आई(दुसर्‍याची) १०) ちいさい(चिइसाइ)- छोटा(आकाराने) ११) きゅう(कि यु उ)- नऊ १२) じゅう(जि यु उ)- दहा १३) ぎゅうにゅう(गि यु उनि यु उ)- गायीचे दूध १४) ええ(एए)- हो १५) とけい(तोकेइ)- घड्याळ १६) おおきい(ओओकिइ)- मोठा(आकाराने) १७) ぼうし(बोउशि)- टोपी  १८) ざっし(झा त्सु शि)- नियतकालिक  १९) これ(कोरे)- हा/ही/हे २०) かばん(काबाङ)- पिशवी २१) それ(सोरे)- तो/ती/ते               

वार, मास आदींची निहोङगो नावे

दिवसनावे वारनावे  ०१) 日曜日(निचियोउबि)- रविवार  ०२) 月曜日(गेत्सुयोउबि)- सोमवार ०३) 火曜日(कायोउबि)- मंगळवार ०४) 水曜日(सुइयोउबि)- बुधवार ०५) 木曜日(मोकुयोउबि)- गुरूवार ०६) 金曜日(किङयोउबि)- शुक्रवार ०७) 土曜日(दोयोउबि)- शनिवार ०८)おととい (ओतोतोइ)- परवा(गेलेला) ०९) きのう(किनोउ)- काल १०) きょう(कि यो उ)- आज ११) あした(आशिता)- उद्या १२ ) あさって(आसा त्सु ते)- परवा(येणारा) मासनावे   ०१) 一月(इचिगात्स)- जानेवारी  ०२) 二月(निगात्स)- फेब्रुवारी ०३) 三月(साङगात्स)- मार्च् ०४) 四月(शिगात्स)- एप्रिल् ०५) 五月(गोगात्सु)- मे ०६) 六月(रोकुगात्स)- जून ०७) 七月(शिचिगात्स)- जुलै ०८) 八月  (हाचिगात्स)- ऑगस्ट् ०९) 九月 (कुगात्स)- सप्टेंबर् १०) 十月(ज्युउगात्स) - ऑक्टोबर् ११) 十一月(ज्युउइचिगात्स) - नोव्हेंबर् १२‌) 十二月(ज्युउनिगात्स) - डिसेंबर् १३) せんせんげつ(सेङसेङगेत्सु)- मागच्याच्या मागचा मास १४) せんげつ(सेङगेत्सु)‌- मागचा मास १५) こんげつ(कोङगेत्सु)- सध्याचा मास १६) らいげつ(राइगेत्सु)- पुढचा मास १७) さらいげつ(साराइगेत्सु)- पुढच्याच्या पुढचा मास १८)なんげつ(नाङगात्सु)- काय मास     वर्ष  

सङ्ख्यांची निहोङगो नावं

 निहोङ्गो एकक नि त्यासाठीचे मराठी शब्द  ०१) (ज्यू) ०२) () ०३) (सेङ)  ०४) (माङ) ०५) (सेङ्माङ) ०६) ०७) ०८) ०९) निहोङ्गो संख्या ०१) (इचि) ०२) (नि) ०३) (साङ) ०४) (योङ)      (शि) ०५) (गो) ०६) (रोक) ०७) (नाना)     (शिचि) ०८) (हाचि) ०९) (क्यू)  १०) (ज्यू)  ११) (ज्यू इचि) २०) (नि ज्यू) ३०) (साङ ज्यू) ४०) (योङ ज्यू) ५०) (गो ज्यू) ६०) (रोक ज्यू) ७०) (नाना ज्यू) ८०) (हाचि ज्यू) ९०) (क्यू ज्यू) १,००) २,००)  ३,००) ४,००) ५,००) ६,००) ७,००) ८,००) ९,००) १,०,००) २,०,००) ३,०,००) ४,०,००) ५,०,००) ६,०,००) ७,०,००) ८,०,००) ९,०,००) १,०,०,००) २,०,०,००) ३,०,०,००) ४,०,०,००) ५,०,०,००) ६,०,०,००) ७,०,०,००) ८,०,०,००) ९,०,०,००) १०,०,०,००)            

नात्यांची निहोङगो नावं

माझे कुटूंब आई वडील भाऊ बहीण वडिलांकडचे नातेवाईक आजोबा आजी चुलत आजोबा (आजोबांचा सख्खा भाऊ) चुलत आजी (आ. स. भावाची पत्नी) चुलत आजी (आजोबांची सख्खी बहिण) चुलत आजोबा (आ. स. बहिणीचे पती) काका काकी चुलत भाऊ चुलत बहिण मामा (आत्याचे पती) आत्या आतेभाऊ आतेबहिण आईकडचे नातेवाईक आजोबा आजी चुलत आजोबा (आजोबांचा सख्खा भाऊ) चुलत आजी (आ. स. भावाची पत्नी) चुलत आजी (आजोबांची सख्खी बहिण) चुलत आजोबा (आ. स. बहिणीचे पती) आजोबा आजी मामा मामी मामेभाऊ मामेबहिण मावशी काका (मावशीचे पती) मावसभाऊ मावसबहिण

निहोङ्गो (जॅपनीज्) शब्दपरडी ०१

あう-(आउ)- भेटणे いえ-(इए)- घर うえ-(उए)- वर xした-(शिता)- खाली あおい-(आओइ)- निळा あかい-(आकाइ)- लाल かお-(काओ)- तोंडावळा/ चेहरा き-(की)- झाड いく-(इकु)- जाणे いけ-(इके)- तळं こえ-(कोए)- ध्वनी かさ-(कासा)- छत्री あさ-(आसा)- सकाळ さけ-(साके)- निहोङ दारु しお-(शिओ)- मीठ いす-(इसु)- खुर्ची つくえ-(त्सुकुए)- टेबल せかい-(सेकाइ)- जग うそ-(उसो)- खोटं たかい-(ताकाइ)- उंच いち-(इचि)- एक ちち -(चिचि) - वडील  

मोजणीसाठीचे निहोङ्गो (जॅपनीज्) शब्द

सपाट गोष्टींसाठी मोजणीचे शब्द   यंत्रांसाठी मोजणीचे शब्द   गोलसर, भरीव गोष्टींसाठी मोजणीचे शब्द   क्रमासाठी मोजणीचे शब्द   माणसांसाठी मोजणीचे शब्द    

नमस्काराची निहोङगो नावं

  निहोङ्गोतले रामराम खालीलप्रमाणे: ०१) おはよう ございます : ओहायोउ गोझाइमासु. हा सकाळी नऊ वाजेतोवर म्हणतात. ०२) こんいちは : कोङ्निचिवा. सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेतोवर म्हणतात. ०३) こんばんは : कोङ्बाङ्वा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत म्हणतात. ०४) おやすみなさい : ओयासुमिनासाइ. रात्री झोपी जातेवेळी म्हणतात.

ब्लॉगरवरचे मराठी, निहोङ्गो (जॅपनीज्) फॉंट्स्

  ०१) हा टाइम्स् नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Times. ०२) हा कलम नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Kalam. ०३) हा मोडक नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Modak. ०४) हा डिफॉल्ट मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is default Marathi font. ०५) हा आर्य नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Arya. ०६) हा डेक्को नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Dekko. ०७) हा कर्म नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Karma. ०८) हा खंड नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Khand. ०९) हा सरपंच नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Sarpanch. १०) हा रोबोटो नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named Roboto. ११) हा पॉप्पिंस नावाचा मराठी फॉंट आहे. शल .,;:'"()? This is Marathi font named...

कानाचे कित्ते कुठे मिळतात?

仮名 चे कित्ते (प्रॅक्टिस् वर्कशीट्स्) वेगवेगळ्या संकेतस्थळांवर (वेबसाईट्स्) मिळतात. त्यापैकी काहींची माहिती खालीलप्रमाणे आहे: ०१) एन्. एच्. के. इझी जॅपनीज् - निहोङ्गोची तोंडओळख करू पाहणार्‍यांसाठी हे उत्तम संकेतस्थळ आहे. ह्यावर कानांच्या कित्त्यासोबत कानांची वळणं (स्ट्रोक्स्) दाखवणारी चलचित्रं (व्हिडिओज्) मिळतात. ह्यावर निहोङोच्या तोंडओळखीसाठीचं पाहूऐकूसे (ऑडिओ-व्हिज्युअल्) अभ्याससाहित्य मिळेल. तुम्ही कित्ता उतरवल्यानंतरही (डाऊनलोड् केल्यानंतरही) ह्यावर थोडं भटका नि त्यावरचं अभ्याससाहित्य पाहिल्यावाचल्यावाचून संकेतस्थळावरून निघू नका. ०२) जपनीज लेसन्स् - ह्यात हिरागाना, काताकानाला टिपल्यानंतर (क्लिक केल्यानंतर) त्याचं पान उघडेल, ज्याच्या शेवटी पी. डी. एफ्. चे जाळदुवे (हाइपरलिंक्स्) दिल्याहेत. बर्‍याचदा त्या शेवटी असल्याने शोधाशोध पुरते, म्हणून आधीच सांगून ठेवलं. मला हा निहोङ्गोचा कित्ता आवडतो, कारण तो युटिलिटेरिअन नि मिनिमालिस्ट प्रकारचा आहे. मी हा कित्ता उतरवला होता. मी कित्त्याला वळणं कळण्यापुरता उतरवला होता, त्याला सत्यप्रतला (झेरॉक्स केला) नाही. कारण, मी काना वळणं गिरवायला चौकटींची...

काना म्हणजे काय?

कानाचा शब्दार्थ काय? 仮 名 कानाचा शब्दार्थ उसनी घेतलेली चिन्हे असा आहे.  काना काङजी ह्या चित्रअंश जातीच्या लिपीतून विकसलेल्या आहेत. प्रत्येक काना हे एक चिन्ह असते. उदा., & हे एक चिन्ह आहे. तुम्हाला & ची वळणे (स्ट्रोक्स), & चा उच्चार, & चा अर्थ तिन्ही पाठ करावे लागतात. कानाला हे लागू पडते. त्यामुळे मराठी व्याकरणात कानाला काहीही म्हणता येत नाही. मग काना कशी शिकावी? पायरी ०१ ) शाळकरी पोरांच्या अंक गिरवायच्या , बेरीज - वजाबाकीसाठीच्या चौकटीच्या वह्या मिळतात . ह्या काना वळणं गिरवायला चांगल्या असतात . ह्यातली प्रत्येक चौकट जवळजवळ ०१ सें . मी . लांबी रूंदीची असते . सुरुवातीला २ आडव्या नि दोन उभ्या चौकटींचा एक मोठा चौकोन करावा . डावीकडच्या प्रतिमेने तुम्हाला ह्याची ढोबळ कल्पना येईल . त्याच्या सीमांवर स्केचपेन किंवा मार्करने रेष ओढावी . मोठ्या चौकोनातल्या रेषा तुम्हाला तुम्ही काढलेली चिन्हांची वळणे ( स्ट्रोक्स ) योग्य त्या चौकोनात नि योग्य त्या भागात येताहेत की नाही , हे पडताळणीसाठी गाइडलाइन्सचे काम करतील . एकदा का तुमच्या वळणांचा आकार हवा तसा नि वळणे चौकोनात हवी त्या ठिक...

इंग्रजीत स्पेलिंग का असते

इंग्रजी ही रोमन लिपीच्या २६ अक्षरात लिहीतात. पण, इंग्रजीत ४४ वर्ण आहेत. वर्ण म्हणजे एखाद्या भाषेतले आवाज होय. उदाहरणार्थ, मॅन शब्दात म् , अ‍ॅ , ङ असे तीन वर्ण आहेत. ४४ वर्ण २६ अक्षरात लिहावे लाग ल्यामुळे एक वर्णासाठी अनेक अक्षरांची मांडणी रूढ झाली. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा वर्णक्रम म्हणजेच स्पेलिङ्ग लक्षात ठेवणे आले. उदाहरणार्थ, आङ्ग्लीत थ् नि द् वर्ण आहेत, पण त्यांसाठी अक्षरे नाहीत; म्हणून Th at cher( थॅ चर) नि Th at ( दॅ ट) या शब्दातील प्रथम ४ अक्षरे सारखी असूनही उच्चार वेगळे आहेत. गंमतीची गोष्ट ही की, इंग्रजीच्या सर्व वर्णांसाठी देवनागरी अक्षरे उपलब्ध आहेत. आपण ती वापरली, तर वर्णक्रम लक्षात ठेवावा लागत नाही. ह्यामुळेच नवनीतच्या इंग्रजीच्या मार्गदर्शकात वर्णक्रमाचे उच्चार देवनागरीत लिहीतात.